Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमात पडलेल्या दोघांच्याही जीवनाचा अखेर शेवट झाला.

प्रेमात पडलेल्या दोघांच्याही जीवनाचा अखेर शेवट झाला.

रायपूर (छत्तीसगड) : लिव्ह इन रिलेशिनशीपमध्ये राहणाऱ्या शिक्षिकेची हत्या केल्यानंतर तिच्या मित्राने पकडलं जाण्याच्या भीतीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कवर्धा जिल्ह्यात घडली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना विश्वकर्मा नावाची शिक्षिका आपला प्रियकर रामा आशिष उपाध्याय याच्यासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये कवर्धा येथे राहत होती. त्या दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाल्याने प्रियकराने आपल्या मित्रासह मिळून आपल्या प्रेयसीला मारून टाकले आणि आरोपीने शिवनाथ नदीत उडी मारली. शिक्षिकेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना दुर्गमध्ये राहणाऱ्या त्याच्या लिव्ह-इन-पार्टनरवर शंका आली. दरम्यान, पोलिसांना कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्ये आणखी एका युवकाबद्दल कळले. त्या युवकाशी आरोपीचं सातत्याने बोलणं होत होते. पोलिसांनी आपल्या तपासात मुख्य आरोपीच्या साथीदाराला सर्वप्रथम अटक केली. त्यातून या हत्याकांडाची उकल झाली.

मुख्य आरोपीच्या साथीदाराने पोलिसांना सांगितले, की आशिष आणि सपना विश्वकर्मा कवर्धामध्ये भाडेतत्त्वावर घर घेऊन लिव्ह इनमध्ये राहत होते. दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाले. त्यानंतर त्याने सपनाला ठार करण्याचा कट रचला. आरोपी आशिष आणि त्याचा मित्र दोघेही कवर्धाला गेले. तिथे त्यांनी आपल्यासोबत सपनाला गाडीत बसवले आणि बेमेतराला गेले. तिथे त्यांनी तिला ठार केले. कोणालाही दुर्गंधही येऊ नये, यासाठी आरोपींनी सपनाचा मृतदेह केशकाल घाटीत फेकून दिला. त्यासाठी त्यांनी तीनदा प्रयत्न केले. त्यानंतर दोन्ही आरोपी पुन्हा दुर्गला आले.

सपना बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी आठ ऑगस्टला नोंदवली. आशिष आणि सपना लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे पोलिसांना तपासात कळले. ते दोघं जिथे राहत होते, तिथे गेल्यावर त्या घराच्या मालकाने पोलिसांना सांगितलं, की त्या दोघांमध्ये कायम भांडणं होत होती. आरोपीचा मृतदेह रविवारी बेमेतरा पोलिसांनी ताब्यात घेतला. सपना आणि आशिष या दोघांचाही आधीच विवाह झालेला होता. त्यामुळे ते एकमेकांशी विवाह करू शकत नव्हते; मात्र एकत्र जरूर राहू शकत होते, म्हणून त्यांनी तसं राहण्याचा निर्णय घेतला होता. पण, अखेर दोघांच्याही जीवनाचा शेवट झाला.

अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…

वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे…

Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…

दीर आणि वहिणीचे जुळले प्रेमसंबंध; नवऱ्याला समजले अन्…

चुलतीच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या अन् नको ते घडलं…

प्रेम, लव्ह मॅरेज अन् प्रेमसंबंध! दादर सूटकेस प्रकरणात पत्नीला अटक…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka