Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्.

प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्.

रांची (झारखंड): प्रेयसीने आपल्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी थेट रांची येथून गोड्डा येथे पोहोचली तसेच पोलिसांकडे तिने न्यायाची मागणी केली. पोलिसांना तिने हकिगत सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीने पोलिसांना सांगितले की, ‘गोड्डा येथील सरौनी येथील रहिवासी असलेल्या प्रियकरासोबत रुग्णालयात भेट झाली होती. भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे जण एका वर्षांपासून रांची येथे सोबत राहत होते. यानंतर प्रियकर गोड्डा येथे त्याच्या घरी परतला. यानंतर त्याचा फोन लागत नाही. प्रेयसीने अनेकदा त्याला फोन केला. मात्र, त्याने तिचा फोन उचलला नाही. त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. प्रियकराला फोन आणि दुचाकीही खरेदी करुन दिली. त्याने पैसेही उकळले. त्या दोघांचे कुटुंबीय लग्नासाठी तयार होते. मात्र, प्रियकर नुकताच होळीच्या दिवशी घरी आला आणि नंतर तो अचानक लग्नाला नकार देऊ लागला. मी माझ्या कमाईतून त्याच्यावर खूप पैसा खर्च केला आहे. असे असतानाही तो माझे दागिने आणि पैसे घेऊन पळून गेला आहे.’

पोलिसांनी सांगितले की, युवतीने अद्याप कोणतीही लिखित तक्रार केलेली नाही. तसेच तिला त्या मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही. पोलिसांनी तिची तिच्या प्रियकराशी भेट घालून द्यावी, अशी विनंती तिने केली आहे.

दुसरीकडे, गोड्डा येथील महिला ठाणे प्रभारी गुलाब किसपोट्टा यांनी सांगितले की, ‘पीडित युवतीने रांची येथील महिला ठाण्यात आधीच तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा तपास रांची पोलिसच करतील. मात्र, युवतीच्या विनंतीवर जेव्हा गोड्डा पोलिसांनी सलोनी गावात जाऊन तपास केला असता मुलाच्या घराला कुलूप लावल्याचे दिसून आले.’

प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे…

प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे…

The post प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka