पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील आदिवासी भागाील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
कोकणकडा येथून या दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून वर्तवण्यात आले आहे. मृतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन युवतीचा समावेश आहे.
श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, (वय 40) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) असे मृत महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. जुन्नर पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी या घटनेबाबतची माहिती दिली आहे. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठिण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुंटूबातील सदस्यांकडून पोलिस देण्यात आली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.
रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडी येथील असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून कार्यरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते, ते बेपत्ता असल्याने त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली होती. याशिवाय रूपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता.
जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. यानंतर शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि महिलेच्या चपला आढळून आल्या होत्या. रविवारी (ता. 22) दाट धुके, पाऊस आणि अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमने दरीत उतरून सर्वत्र शोध घेतला असता, रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर रेस्क्यू टीमने त्यांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले…
पुणे! युवकाने डिप्रेशनच्या कारणातून केला आयुष्याचा शेवट; ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले…
महाविद्यालयीन युवती संध्या पाठक हिच्या आत्महत्येचं खरं कारण समोर…
पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…
पुणे जिल्ह्यात दिव्यांग युवकाचा खून; बंद गाडी मध्ये आढळला मृतदेह…
पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…
The post पुणे जिल्ह्यात तलाठी अन् महाविद्यालयीन युवतीचा आढळला मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

