Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ केले जप्त.

पुणे पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ केले जप्त.

पुणे (संदिप कद्रे): प्रतिबंधीत मांडुळांची विक्री करणा-या दोन युवकांना वानवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ जप्त केले आहे.

वानवडी पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक १४/०२/२०२५ रोजी कोंबीग ऑपरेशन व अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पो.उप निरी धनाजी टोणे, सहायक पोलिस उप निरीक्षक रमेश साबळे, पोलिस अमंलदार सर्फराज देशमुख, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, संदिप साळवे असे वानवडी पोलिस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पोलिस अंमलदार संदिप साळवे व सर्फराज देशमुख यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दोन जण हे मांडूळ जातीचे वन्यप्राणी घेवून विक्री करण्यासाठी साईबाबा मंदिर चौक, जगताप चौक, वानवडी पुणे येथे येणार असल्याची बातमी मिळ्याल्याने पोलिस उप निरीक्षक धनाजी टोणे यांनी दोन पंच साक्षीदार व स्टाफ समवेत साईबाबा मंदिर चौक, जगताप चौक, वानवडी पुणे येथे जावून सापळा रचला.

१५/०२/२०२५ रोजी रात्रौ ००/५० वाजण्याचे सुमारास दोन जण येताना दिसले व त्यापैकी एकाचे हातात लाल व काळे रंगाची बॅग दिसली. बातमीप्रमाणे खात्री होताच त्यांना ०१/०० वाजता छापा घालून ताब्यात घेतले असता त्यांनी त्याची नावे १) महंमद कामराण अब्दुल करीम (वय ३० वर्षे रा. गुलबर्गा, हागरगा क्रॉस, झमझम कॉलणी, नसीरिया मश्जिद जवळ, कर्नाटक राज्य), २) मिथुन शेट्टीबा मंजुळे (वय ३० वर्षे रा. मु.पो. विद्यानगर ता. निलंगा जि. लातूर) असे असल्याचे सांगीतले. त्यांच्या कब्जात १० लाख रुकि.चे एक रेडसन जातीचे मांडुळ हा वन्यजीव प्राणी मिळून आला. व तो वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत शेडयुल ३ मधील प्रतिबंधीत मांडूळ जातीचे सरपटनारे प्राणी असल्याची खात्री झाल्याने पोउनि धनाजी टोणे यांनी आमचे व पंचांचे उपस्थितीत सविस्तर पंचनाम्याने ताब्यात घेवून वरील आरोपी विरुध्द
वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम २ (१६), ९ ४४ (१) (सी) प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. रेडसन जातीचे मांडुळ हे संचालक, वन्य प्राणी संग्राहालय, बावधान, पुणे याचे ताब्यात संरक्षणार्थ देण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही वरीष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमने, पोलिस निरीक्षक (गुन्हे), गोविंद जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पो.उप निरी धनाजी टोणे, पोलिस अंमलदार रमेश साबळे, सर्फराज देशमुख, संदिप साळवे, सोमनाथ कांबळे, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार यांनी केली आहे.

राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू…

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी; फरार आरोपी जेरबंद…

पुण्यात 15व्या मजल्यावरून उडी घेत जीव देणाऱ्या विद्यार्थिनीचे मृत्यूचे कारण समोर…

पुणे पोलिसांच्या 'तरंग' कार्यक्रमाला लागली नाराजीची किनार…

The post पुणे पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचे रेडसन मांडूळ केले जप्त… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka