Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना.

वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना.

खनौ (उत्तर प्रदेश) : वहिनी आणि दिराच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उन्नाव येथील असिवान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावात घडली आहे. एका व्यक्तीने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर स्वतःच्या वहिनीवर (वय 30) बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

वहिनीने त्याला विरोध केल्यामुळे संबंधित व्यक्तीने तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला जिवंत जाळले. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या वहिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये तुरुंगात गेला होता. पाच महिन्यांनंतर तो 2 डिसेंबर 2024 ला जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा 16 डिसेंबर 2024 रोजी त्याच्या वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करून तिची हत्या केली.

सोमवारी (ता. १६) रात्री पीडित महिला तिच्या दोन मुलांसह घरात झोपली होती. पीडितेचा पती लखनऊमध्ये काम करतो. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पीडितेच्या घराशेजारी राहणारा तिचा दीर हा तिच्या घरात शिराला. त्यानंतर त्याने पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध करताच आरोपीने तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला जखमी केले. त्यानंतर आरोपीने पीडितेला घरापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या पेंढ्याच्या ढिगाऱ्यावर टाकले. त्यानंतर आरोपीने तो ढिगारा पेटवून दिला. हे सर्व पाहून महिलेच्या नऊ वर्षांच्या मुलाने आरडाओरडा केला. तो ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

घटनेची माहिती पीडितेच्या मुलाने वडिलांना दिली. त्यानंतर मृत महिलेचा पती रात्री दीडच्या सुमारास गावी पोहोचला. पोलिसांना त्याने घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी हा लखनऊ-बांगरमऊ कोडवा खेडा वळणाजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथे पोलिस पोहोचल्यावर आरोपी व पोलिसांमध्ये चकमक झाली. आरोपीच्या डाव्या पायाला गोळी लागली असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

मेव्हणी घरात एकटीच असल्याचे पाहून दाजी घरात घुसला अन्…

पोलिस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; कोर्टात सगळं उघड…

हृदयद्रावक! प्रियकरासाठी व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् घेतला जगाचा निरोप…

पत्नीसोबत नको त्या अवस्थेत युवकाला पाहिलं अन् नवऱ्याने घेतला क्रूरपणे बदला…

धक्कादायक! घरातले कामावर जाताच दिराने केला गरोदर वहिनीवर हल्ला…

वहिनीच्या प्रेमात आंधळा झाला दीर अन् नवऱ्याला समजताच…

पोलिसाने पत्नीला केला मेसेज; 'वहिनी तुम्ही खूप हॉट…' अन् रंगेहात सापडला…

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

The post वहिनी आणि दिराच्या नात्याला काळीमा फासणारी घडली धक्कादायक घटना… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka