ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
अक्षय शिंदे याचे आई-वडील सोमवारी रात्रभर अक्षयचा मृतदेह असलेल्या कळवा शासकीय रुग्णालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. या दोघांनाही अक्षयचा मृतदेह दाखवण्यात आलेला नाही. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतरच मृतदेह तुम्हाला दाखवू, असे अक्षयच्या आई-वडिलांना सांगण्यात आले आहे. अक्षयचा मृतदेह आता जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला जाईल. त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे सांगितले आहे. मात्र, अक्षय शिंदे याच्या पालकांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
अक्षय शिंदे याच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अक्षयच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘पोलिस आम्हाला काहीच बोलले नाहीत. आम्ही अक्षयला भेटायला तुरुंगात गेलो होतो तेव्हा त्याने मला विचारले, ‘मम्मी मला कवा घेऊन जाणार तुम्ही?’ मी त्याला म्हणाले की, मी वकिलांशी बोलून घेते, आपण एका महिन्यानंतर तुला सोडवू. त्यानंतर मी अक्षयला विचारले की, तुला खायला-प्यायला देतात का? त्यावर अक्षयने, हो मला खायला देतात, असे सांगितले.’
‘अक्षय याने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहले होते, माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो कागद मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम, हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात कागद ठेवला असेल. पोलिस आता खोटं बोलत आहेत. त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत,’ असा आरोप अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केला आहे.
‘बदलापूर प्रकरणात आणखी सहाजण आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधले नाही आणि आमच्या पोराला मारुन टाकलं. त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला मारण्यात आले. आम्ही सध्या स्टेशनवर कचऱ्यात राहतो, तिथेच झोपतो. पोलिसांनी अक्षयला पकडून नेले, तेव्हापासून आम्ही फरार आहोत, मीडियासमोर आलो नाही. याप्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला तयार आहोत,’ असे अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.
माझ्या मुलावर आरोप खोटे आहे. माझ्या मुलाला पैसे देऊन ठार मारलं आहे. मी अक्षयला ३.३० वाजता जेलमध्ये भेटलो होतो. त्याला रंगाच्या पिचकरी सुद्धा कशी वापरायची ते माहिती नव्हती. पोलिस लोकांची बंदुक घेऊन कशी फायरिंग करणार. फटाके सुद्धा तो फोडत नव्हता. आम्हाला पोलिसांनी काहीच सांगितलं नाही. आम्हीच न्यूज चॅनलवर पाहतोय' अशी प्रतिक्रिया अक्षय याच्या वडिलांनी दिली.
‘शाळेमध्ये दुसरं कुणी तरी केलं आहे. त्याच्यावर आरोप टाकला आहे. 12 आणि 13 तारखेपासून शाळेतील लोकांना माहिती होतं. माझं पोरगं १७ तारखेला शाळेत गेला होता. हे जर माहिती असता तर तो शाळेत गेला नसता. माझं पोरगं गरीब गाय आहे. त्याला अशा कोणत्याही सवयी नाही. पोलिस काहीही म्हणतील, पोरगं माझं फटाके सुद्धा फोडत नव्हता. गाड्यांना सुद्धा घाबरत होता. आता आम्हाला सुद्धा गोळ्या टाकून ठार मारून टाका. आम्ही पण मरणार त्याच्यासोबत. आम्ही एक टाईमाचे कमावून खाणारे लोक आहोत. शाळेत अनेक लोकं होती जे पळून गेले, त्यांना का काही करत नाही' असेही अक्षयची आई म्हणाली.
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!
बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…
The post अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांचा ‘त्या’ कागदाबाबत गंभीर आरोप… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

