पुणे: पुणे शहरातील कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्यानंतर घायवळ गॅंगची प्रमुख गॅंगस्टार निलेश घायवळ हा पत्नी आणि मुलासह युरोपला पळाला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीदरम्यान नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
निलेश घायवळ आणि त्यांच्या पत्नीच्या नावे दोन वेगळ्या मतदारसंघात चार मतदान ओळखपत्रे असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. त्यासाठी निलेश घायवळ याने नावात बदल केल्याचे दिसून येत आहे. कोथरुड विधानसभा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात निलेश आणि त्याची बायको स्वाती घायवळच्या नावे ही ओळखपत्रे आहेत.
काय बदल केले पाहा…
Nilesh Ghaywal voter ID
पती - निलेश बन्सीलाल गायवळ
ओळखपत्र क्र. DRD1360288 - कोथरूड, पुणे (वय 47)
TKM8217994 - कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 48)
पत्नी - स्वाती निलेश गइवाल
ओळखपत्र क्र. SAO7387947 - कोथरूड, पुणे (वय 42)
TKM8218026 - कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 33)
Nilesh Ghaywal voter ID: उघडकीस आलेल्या विसंगती
दुहेरी नोंदणी - पुणे व अहमदनगर (~150 किमी अंतर)
कर्जत मतदारसंघात सलग क्रमांक (297 आणि 298) → एकत्र नोंदणी?
पतीच्या नावात खेळ: निलेशकुमार गायवळ विरुद्ध निलेश गायवळ
Nilesh Ghaywal voter ID: एकच कुटुंब, 2 शहरे, 4 मतदार ओळखपत्रे आहेत. डुप्लिकेट नोंदी, नावातील फेरफार, खोटे वय म्हणजेच मतदान बनवेगिरी, एक कुटुंब असं करू शकते, तर अजून किती "दुबार मतदार" याद्यांमध्ये असतील याची कल्पना करा, असेही माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटले आहे. नावात किंचित बदल करून किंवा जसं नाव आहे तशा नावासह जर महाराष्ट्रामध्ये किंवा दुसरीकडे कुठेही नोंदणी केली तर दोन-दोन, तीन ठिकाणी तर ते अत्यंत चिंतेची बाब आहे. याची चौकशी झाली पाहिजे. हे एकमेव उदाहरण समोर आले आहे असे अनेक प्रकार समोर येऊ शकतात. अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये हजारो नोंदणी झालेले असण्याची शक्यता आहे. असही विजय कुंभार यांनी म्हटले आहे.
गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….
कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…
गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…
पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…
The post गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

