Dailyhunt
पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण.

पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण.

पुणे: पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांकडून काही पोलिसांना प्रतिनियुक्तीवर सोयीच्या ठिकाणी संलग्न केले जाते. मात्र, सोयीने संलग्नता देण्याची कायदेशीर आणि प्रशासकीय तरतूद नाही.

त्यामुळे बदली झालेल्या पोलिसांना पाच दिवसांत बदलीच्या ठिकाणी पाठवावे, असा आदेश अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी काढला होता.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कर्मचारी यांना सोयीस्कर होईल या करता सर्वसाधारण बदल्या करण्याचे आयोजन निश्चित झालेले होते. त्या अनुषंगाने दिनांक १ ऑगस्ट, ३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी सदरच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु, सदरच्या बदली यादीचे निरीक्षण केले असता सदरची बदली ही खूप मोठ्या आर्थिक व्यवहाराच्या छायेखाली आणि प्रत्येक विभागाच्या पोलिस उपायुक्त यांनी त्यांच्या मर्जीतील कर्मचारी व अधिकारी यांच्या बदल्या आर्थिक फायद्यासाठी करून घेतल्या आहेत, अशी चर्चा पोलिस दलात आहे. याबाबत पोलिस आयुक्तालयांमधील अंमलदारांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.

सदरच्या बदल्यांमध्ये काही कर्मचारी डिफॉल्ट वाले व काही कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल असूनही त्यांच्यावर प्राथमिक व विभागीय चौकशी चालू असूनही त्यांच्या बदल्या त्यांच्या मागणीनुसार झाल्याची चर्चा आहे. पोलिस मुख्यालयातील पाच वर्षे पूर्ण होऊनही बरेचसे अंमलदार वसुली वाल्यांच्या बदल्या न करता त्यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे त्यांना मुख्यालय येथेच ठेवून घेतलेले आहेत. काही कर्मचारी हे बदली दरबार साठी उपस्थित नसतानाही त्यांना ऐच्छिक नेमणूक देण्यात आलेली आहे. काही कर्मचारी ज्यांना चार-पाच वर्षे एकाच ठिकाणी संलग्न ठेवले होते, त्यांना त्याच ठिकाणी नेमणूक करून पुढील पाच वर्षाचा मोठा बोनस देण्यात आला आहे. गुन्हे शाखा व इतर पोलिस स्टेशन येथील पाच वर्षे पूर्ण होऊनही तेथील ‘वसुली बहाद्दर’ यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे कोणाच्या आशीर्वादाने?, अशी दबक्या आवाजात चर्चा पोलिस दलात आहे. पोलिस दलामध्ये बदल्यानंतर नाराजीचा सुरू पसरलेला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून नाराजी असलेल्या पोलिसांचे काय म्हणणे आहे? पोलिस दलात काय चर्चा सुरू आहेत, त्या पुढीलप्रमाणे…

● सदर बाबत ॲक्शन न झाल्यास मेहरबान मॅट कोर्टात दाद मागण्याची कारवाई होणार अशी पोलिसांच्या नाराजीतून दिसून येत आहे.
● महिला पोलिस अंमलदार यांना विनंती बदली साठी कार्यालयामध्ये बोलवून त्यांना त्यांच्या इचछाविरुद्ध पोलिस स्टेशन व शाखा जबरदस्तीने घ्यावेच लागतील असे आदेश देण्यात आले होते. सदर आदेशावरून महिला अंमलदार यांनी त्यांच्या अक्षरशः रडत व्यथा मांडूनही त्यांना त्यांच्या विनंतीच्या विरुद्ध नेमणूका देण्यात आलेल्या आहेत.
● महिला अंमलदार या रडत असतांना मंचावरील अधिकारी यांची वागणूक निर्दयी होती.
● पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालायवर नुकत्याच झालेल्या बदल्या या आर्थिक घेवाण देवाण व मर्जीतील लोकांना आर्थिक फायद्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आहेत, असा संशय आहे.
● गुन्हे शाखा व मस्का पोलिस स्टेशन येथील वसुली वाल्यांना त्यांचा पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा त्यांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्यांनी त्याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहून बदली चे अर्ज सुद्धा दिलेले नाहीत.

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

The post पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka