(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)प्रवीण चव्हाण हे गेल्या २० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. कुटुंबाला पोलिस दलाची पार्श्वभूमी. वडील श्रीराम चव्हाण हे सहाय्यक पोलिस अधीक्षक (ACP) या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
शिक्षण करत असताना आणि वडिलांचा पोलिस दलातील रुबाब पाहून पोलिस अधिकारी होण्याची इच्छा निर्माण झाली आणि स्पर्धा परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात पोलिस अधिकारी पदाला गवसणी घातली. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर अनेक गुन्हे उघड केले असून, गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…
प्रवीण चव्हाण यांचे संभाजीनगर हे गाव. परंतु, वडील पोलिस दलात असल्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचे शिक्षण झाले. अभ्यासामध्ये पहिल्यापासून हुशार. महसूल विभागामध्ये क्लास वन अधिकारी होण्याची इच्छा होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण
केल्यानंतर बीएड केले. पण, बीएड करत असतानाच पोलिस अधिकारी होण्याची आवड निर्माण झाली. आईने पाठिंबा दिला आणि स्पर्धा दिल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक झाले. कुटुंबाचा पोलिस दलाचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला. पोलिस अधिकारी झाल्यानंतर कुटुंबामध्ये आनंद झाला. पोलिस दलात दाखल झाल्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत.
पोलिस दलातील कार्यकाल…
२००५ ते २००६ – प्रशिक्षण
२००६ ते २०१२ – नागपूर
२०१२ ते २०१७ – संभाजीनगर, बीड
२०१७ ते २०१९ – वर्धा
२०१९ ते २०२१ – अहमदनगर
२०२१ ते २०२४ – नाशिक
बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण…
वडील श्रीराम चव्हाण हे सहाय्यक पोलिस अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. पण, मुलाने वेगळे क्षेत्र निवडून तेथे आपला ठसा उमटवावा, अशी वडिलांची इच्छा होती. आई कस्तुरा चव्हाण यांची जुनी दहावी. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून अनेक पाढे आजही तोंडपाठ आहेत. तर, आईने आवडत्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा सल्ला दिला. प्रवीण चव्हाण यांना बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करून विद्यार्थी घडवता आले असते. पण, पोलिस दलाचा रुबाब त्यांना खुणावत होता. पोलिस अधिकारी नाही झाले तर शिक्षक म्हणून तर नोकरी होतीच. पण, एकदा स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. खरं तर प्रवीण चव्हाण यांच्याकडे पाहिल्यानंतर शिक्षकाचा पिंड वाटतो. पण, पोलिस दलातही आल्यानंतरही धडाकेबाज कारवाया करत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत.
पहिल्याच प्रयत्नात अधिकारी…
स्पर्धा परिक्षा देऊन पोलिस अधिकारी होण्याचे ठरवले होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुणे शहर गाठले. ज्ञानप्रबोधिनीमध्ये खूप काही शिकायला मिळाले. शिवाय, माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या क्लासमध्ये राहून अभ्यास सुरू केला. अभ्यास करत असताना अविनाश धर्माधिकारी यांना अगदी जवळून पाहता आले. विद्यार्थी दशेत असताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याचा आयुष्यात मोठा फायदा होत आहे. स्पर्धा परीक्षेला मोठ्या धैर्याने सामोरे गेले आणि निकाल हाती आला. पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि मोठा आनंद झाला.
प्रवीण चव्हाण हे पोलिस दलातील प्रशिक्षणानंतर पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. सुरुवातीचा कार्यकाल त्यांचा विदर्भात गेला. विदर्भामध्ये काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले. शिवाय, विविध गुन्हे उघड करत असताना अनेकांना न्याय मिळवून देता आला. त्यांनी उघड केलेले निवडक गुन्हे पुढीलप्रमाणे…
पैशांसाठी बदला…
एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून कुटुंब काम करत होते. सासरा आणि नवऱ्याने चिमुकल्या मुलीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला म्हणून महिलेने तक्रार दाखल केली होती. प्रवीण चव्हाण यांच्याकडे तपास आला होता. पण, सासरा आणि नवऱ्याने हात जोडून विनंती करत होते की, आम्ही असे काही केलेच नाही म्हणून सांगत होते. प्रथमदर्शनी तरी ते निर्दोष वाटत होते. तपास सुरू केल्यानंतर घटनास्थळावरून विविध वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. संबंधित प्रकरण परिसरात जोरदार गाजत होते. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी करावी, अशी सर्वांची इच्छा होती. पण, प्रवीण चव्हाण यांचे आतून मन काही वेगळेच सांगत होते. महिलेचा जबाब आणि घटनाक्रमावरून बनाव असल्याचे जाणवत होते. शिवाय, डॉक्टरांनी मुलीच्या पोटामध्ये विष गेलेच नसल्याचे सांगितले. राज्यात त्या वेळी गर्भपाताचे प्रकरण गाजत होते. वरिष्ठ पातळीवरून सतत दबाव वाढत होता. पण, दोन गरीब व्यक्ती निर्दोष वाटत असताना त्यांना शिक्षा कशाबद्दल? असे सतत वाटत होते. अखेर, डॉक्टरांचा अहवाल हाती आला आणि महिलेच्या विसंगतीमुळे खरी माहिती पुढे आली. महिलेने केवळ पैशांसाठी बदला घेण्यासाठी हा बनाव रचल्याचे तपासादरम्यान समोर आले. नवरा आणि सासऱ्याला या प्रकरणात तिला अद्दल घडवायची होती. पण, गरीब कुटुंब असल्यामुळे त्यांच्याकडे पैसेच नव्हते. अखेर, तपास पूर्ण झाला आणि दोघा गरीब पिता-पुत्रांना न्याय मिळाला. अन्यथा न केलेल्या चुकीबद्दल दोघांना कारागृहात जावे लागले असते. दोघांनाही अश्रू अनावर झाले आणि प्रवीण चव्हाण यांचे पाय धरले. पोलिस अधिकारी म्हणून तपासादरम्यान गुन्हा दाखल करून दोघांना आत टाकून विषय तत्काळ संपवता आला असता. पण, गरीब सालगडी म्हणून काम करणाऱ्या दोघांना न्याय मिळवून दिल्याचे मोठे समाधान मिळाले, असे प्रवीण चव्हाण सांगतात.
एकतर्फी प्रेम अन् ॲसिड हल्ला…
मध्य प्रदेशातील एक युवती नागपूरमध्ये कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती. नागपूरमध्ये तिचे नातेवाईक राहायला होते. नात्यामधील एका युवकासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पण, पुढे काही दिवसांनी चांगले स्थळ आल्यामुळे युवतीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न ठरवले. यामुळे युवती नागपूर सोडून मध्य प्रदेशात जाणार होती. प्रेयसी आपल्याला सोडून जाणार आणि दुसऱ्या युवकासोबत लग्न करणार म्हणून प्रियकर नाराज झाला होता. प्रियकराने नैराश्यातून युवतीच्या चेहऱ्यावर ॲसिडने हल्ला केला. यामुळे युवती गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी अवस्थेतच तिने जबाब दिला होता. मात्र, युवक ॲसिडने हल्ला केल्याचे नाकारत होता. युवकाला ताब्यात घेतले पण कबूल होत नव्हता. प्रवीण चव्हाण यांनी अखेर पोलिसी खाक्याचा वापर न करता भावनिक वातावरण निर्माण केले. भावनिक झाल्यानंतर त्याने हल्ला केल्याचे कबूल केले. शिवाय, ॲसिड खरेदी करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा ओळखल्यामुळे ठोस पुरावे मिळाल्यामुळे त्याला शिक्षा झाली. प्रवीण चव्हाण यांनी न्याय मिळवून दिल्यामुळे युवतीने त्यांना भाऊ मानले. शिवाय, राखी बांधली. पुढे युवतीचा विवाह झाला. पण, तिने आपल्याला मदत केल्याची जाणीव ठेवत प्रवीण चव्हाण यांना भेटत राहिली. बहीण-भावाचे एक वेगळे नाते तयार झाले.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
Loading…
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
Loading…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…
The post वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

