Dailyhunt
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)गजेंद्र पाटील हे गेल्या १८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील जन्म. शालेय शिक्षण घेत असतानाच वर्दीचे आकर्षण निर्माण झाले आणि पोलिस अधिकारी व्हायचेच हे ठरवले.

खेळाची आवड आणि अभ्यासात हुशार. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्या प्रयत्नातच अधिकारी पदाला गवसणी घातली. कुटुंबातील ते पहिले पोलिस अधिकारी ठरले. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर धडाकेबाज कारवाया करून डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्याविषयी थोडक्यात…

गजेंद्र पाटील यांचे धुळे जिल्ह्यातील नवलनगर गाव. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील जन्म. वडील जिल्हा परिषदेत नोकरीला. शाळेमध्ये असतानाच पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू होती. लहानपणापासून मैदानी खेळाची आवड. व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये ते विद्यापीठात प्रथम आले होते. पदवी प्राप्त झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. घरच्या घरीच कोणताही क्लास न लावता अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले आणि पहिल्या प्रयत्नातच अधिकारी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्रात आठवे आले. कुटुंबातील पहिले पोलिस अधिकारी झाल्यामुळे कुटुंबीयांना मोठा आनंद झाला. पोलिस अधिकारी झाल्यानंतर धडाकेबाज कारवाया करत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. संवेदनशील भागात काम करून परिस्थिती हाताळायची आणि गुन्ह्याचा तपास करण्याची त्यांना आवड आहे.

गजेंद्र पाटील यांनी प्रशिक्षण झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात काम केले आहे. सुरुवातीलाच प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केल्यामुळे खूप काही शिकायला मिळाले आणि अनुभवही आहे. त्यांना विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक, पोलिस महासंचालक पदक मिळाले असून, ३५० रिवॉर्ड्स मिळाले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये काम करत असताना अनेक गुन्हे उघड केले आहेत. एक अधिकारी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळवून देता येईल, याकडे त्यांनी पाहिले आहे. तपासाची आवड असल्यामुळे गुन्हे उघड करून अनेकांना जेरबंद केले आहे. त्यांनी काही उघड केलेले गुन्हे पुढीलप्रमाणे…

फिर्यादी मुलगा निघाला आरोपी…
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. कुटुंबच संपल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. कुटुंबातील एक मुलगा जिवंत होता आणि त्याने तक्रार दाखल केली होती. गजेंद्र पाटील यांच्याकडे तपास होता. खुनाचा कोणताही धागादोरा नव्हता. रात्रंदिवस तपास सुरू होता. तपासादरम्यान तक्रार दाखल करणाऱ्या मुलाच्या बोलण्यात विसंगती जाणवत होती. संशयाची सुई त्याच्या दिशेने फिरल्यामुळे त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान दृष्यम चित्रपट पाहून आई, वडील आणि भावाची हत्या केल्याचे त्याने कबूल केले. फिर्याद देणाराच आरोपी निघाला आणि काही दिवसांमध्येच खुनाचा गुन्हा उघड करण्यात गजेंद्र पाटील यांना यश आले.

विम्यासाठी दुसऱ्याचा खून…
एका व्यक्तीने विम्याची रक्कम मिळविण्यासाठी स्वतःचा मृत्यू दाखवून दुसऱ्याच व्यक्तीचा खून केला होता. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पण, कुटुंबामधील व्यक्तींचे रडणे नाटकी वाटत होते. शिवाय, हिंदू व्यक्तीचा मृत्यू पण शवविच्छेदन अहवालादरम्यान मृत व्यक्ती हा मुस्लिम असल्याचे पुढे आले होते. गजेंद्र पाटील यांनी तपास सुरू केल्यानंतर आपले भांडे उघड पडणार असल्याचे जाणवताच आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. खून केलेली व्यक्ती ही तमिळनाडूमधील होती. गजेंद्र पाटील यांनी खून झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना शोधून काढले. अन्यथा, मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना खून झाल्याचे समजलेसुद्धा नसते. पण, योग्य दिशेने तपास करून मृत व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे तर आरोपीला शिक्षा देण्याचे काम केले आहे.

साशी गॅंग गजाआड…
रेल्वेमध्ये चोरी करण्यामध्ये हरियानामधील साशी गावामधील साशी गँग पटाईत आहे. रेल्वेमध्ये चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. गजेंद्र पाटील यांनी तपास करून साशी गँगला गजाआड केले. शिवाय, लाखो रुपयांचे सोने जप्त केले होते.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

Loading…

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

The post वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka