Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या.

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या.

हमदाबाद (गुजरात): अहमदाबाद येथे गुरुवारी (ता. 12) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला.

अहमदाबाद विमान अपघातात एकमेव प्रवाशी बचावला आहे. रमेश विश्वकुमार (वय 40) असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रमेश विश्वकुमार या अपघातामध्ये नेमका कसा वाचला, याबाबत विविध चर्चा सुरु आहे. मात्र यादरम्यान स्वत: रमेश विश्वकुमारने महत्वाची माहिती दिली आहे. विमानाच्या ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. मी सीटसह खाली पडलो होतो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि जेव्हा मला समोर काही रिकामी जागा दिसली तेव्हा मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला एक भिंत होती, कदाचित तिथून कोणीही बाहेर पडू शकले नाही. माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस, एक काका, काकू आणि सगळे जळत होते. या अपघातात विश्वासचा डावा हात गंभीरपणे भाजला, पण त्याचा जीव वाचला आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स सापडला आहे. फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडला आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधून अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे. दोनपैकी एक ब्लॅकबॉक्स सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ब्लॅकबॉक्स सापडल्याने अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे.

अहमदाबाद ते लंडन विमानातील कुटुंबाचा सेल्फी ठरला शेवटचा…

अहमदाबाद विमान अपघात! जळालेले मृतदेह अन् पायलटचा शेवटचा मेसेज…

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रच्या 6 जणांचा मृत्यू; पाहा नावे…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

स्फोट! पुणे विमानतळाजवळ धडाधड फुटले 10 सिलेंडर…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka