हैद्राबाद (तेलंगणा): एका महिला पोलिस हवालदाराची तिच्याच भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. २) घडली आहे. पतीशी फोनवर बोलत असताना भावाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला.
हैदराबादमध्ये एका भावाने आपल्या पोलिस हवालदार बहिणीची निर्घृणपणे हत्या केली. महिला हवालदाराने नुकतेच कुटुंबाविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे भावाला प्रचंड राग आला होता आणि रागाच्या भरात त्याने बहिणीची हत्या केली. इब्राहिमपट्टणम पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हयातनगर पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस हवालदार दुचाकीवरून ड्युटीसाठी जात असताना ही घटना घडली आहे.
एस नागमणी या महिला हवालदाराने २१ नोव्हेंबर रोजी यादगिरीगुट्टा येथे श्रीकांतशी विवाह केला होता. नागमणीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता आणि तिचा भाऊ परमेश याने या जोडप्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सोमवारी परमेश याने नागमणीची हत्या केली.
दोघांनी लग्न केल्यानंतर परमेश आणि कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आणि त्याचा विवाह स्वीकारण्याचे आणि जोडप्याला कोणताही त्रास देण्याचे आवाहन आणि समुपदेशन करण्यात आले होते. मात्र, पोलिस समजूत काढल्यानंतरही परमेशने धमक्या दिल्याचा आरोप श्रीकांतने केला होता. रविवारी नागमणी आणि श्रीकांत हे हैदराबादवरुन इब्राहिमपट्टणम येथे आले होते.
सोमवारी सकाळी श्रीकांत कामावर निघून गेला आणि नंतर त्याने नागमणीला कामावर गेलीस का नाही हे विचारण्यासाठी फोन केला. त्या फोन कॉल दरम्यान नागमणीने श्रीकांतला सांगितले की तिचा भाऊ तिच्यावर हल्ला करत आहे. त्यानंतर फोन कट झाला. नागमणी कामावर जाताना रायपोलजवळ आली तेव्हा परमेशने कारमधून तिचा पाठलाग केला आणि तिच्या स्कूटरला पाठी मागून धडक दिली. एस नागमणी रस्त्यावर पडल्यानंतर परमेशने कुऱ्हाडीने तिची हत्या केली. श्रीकांत घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत नागमणीचा मृत्यू झाला होता. हत्येनंतर काही मिनिटांत परमेश पोलिसांना शरण आला.
दरम्यान, नागमणी आणि तिच्या भावाचाही त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद सुरू होता. १५ दिवसांपूर्वी, नागमणीने रायपोलू गावातील श्रीकांतशी लग्न केले होते. पोलिसांनी तिच्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास सुरू केला आहे.
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
महिला पोलिस एक महिन्याच्या सुट्टीवर गेली अन् नको ते घडलं…
Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…
जिद्दीला सलाम! महिला पोलिस अधिकाऱ्याचा वयाच्या पन्नासाव्या वर्षी विक्रम…
अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…
महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
Loading…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…
The post महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

