Dailyhunt
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)तृप्ती सोनवणे या गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शिक्षिका म्हणून काम करत असताना आई-वडिलांच्या इच्छेखातर पोलिस दलात आल्या आणि राज्यभर गाजलेले डॉ. संतोष पोळ हत्याकांडाचा उत्कृष्टपणे तपास केला.

शिवाय, अनेक गुन्हे उघड केले आहेत. एका आवाजानेच आरोपी घाबरत असून, पोलिस दलात डॅशिंग महिला पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांच्या विषयी थोडक्यात…

तृप्ती सोनवणे यांचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कुंभारखेड हे गाव. मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म. वडील सरकारी नोकरीत. तिन्ही बहिणी उच्चशिक्षित. तृप्ती सोनवणे यांनी बीएड करून शिक्षिकेचे काम सुरू केले होते. पण, त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावे, अशी आई-वडिलांची इच्छा. त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. कुटुंबातील त्या पहिल्या पोलिस अधिकारी ठरल्या. आई-वडिलांना मोठा आनंद झाला आणि पोलिस दलात दाखल झाल्या.

शिक्षिका…
तृप्ती सोनवणे यांना दहावी, बारावीमध्ये चांगले गुण मिळाले होते. बारावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बीएसस्सी पूर्ण केले. पदवी प्राप्त केल्यानंतर आवड म्हणून बीएड केले. पुढे खासगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. शिवाय, खासगी क्लासेस घेऊ लागल्या. काही दिवसांमध्येच त्यांची सोज्वळ शिक्षिका म्हणून ओळख निर्माण झाली. शिक्षिका म्हणून अडीच वर्षे ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले.

स्पर्धा परीक्षा…
मुलगी शिक्षिका म्हणून काम करत असली तरी हुशार असल्यामुळे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊन सरकारी नोकरी मिळवावी, अशी आई-वडिलांची इच्छा होती. अनेकदा त्यांनी इच्छा बोलूनही दाखवली होती. आई-वडिलांच्या इच्छेखातर तृप्ती सोनवणे यांनी घरच्या घरी अभ्यास सुरू केला. शिक्षिका म्हणून काम करत असताना त्याचा अभ्यासामध्ये फायदा होत होता. प्रथमच २००५ मध्ये स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या.

शिक्षिका ते पोलिस अधिकारी…
तृप्ती सोनवणे यांचा खरं तर सुरुवातीचा शिक्षिकेचा पिंड. आई-वडिलांच्या इच्छेखातर पोलिस दलात आल्या. पोलिस दलात आल्यानंतर सुरुवातीला लाजऱ्या स्वभावाच्या होत्या. पण, प्रवाहात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. पोलिस दलातील सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेले सुधीर अस्पात यांच्याकडून डॅशिंगपणा शिकल्या. सीआयडीचे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, तानाजी सावंत यांच्याकडून तर खूप काही शिकल्या. पोलिस दलातील हे तिघे गुरू आहेत, असे तृप्ती सोनवणे सांगतात.

तृप्ती सोनवणे यांनी पोलिस दलात काम करत असताना धडाकेबाज कामगिरी करत विविध गुन्हे उघड केले आहेत. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना १२५ रिवॉर्ड्स मिळाले आहेत. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. पोलिस दलात आल्यानंतर सुरुवातीला असणारा लाजरा स्वभाव बदलला आणि डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळखू लागल्या. एका आवाजाने आरोपी थरथर कापू लागले आणि गुन्हे उघड होऊ लागले. राज्यात गाजलेल्या गुन्ह्यांसह अनेक गुन्हे त्यांनी उघड केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिल्यानंतर खूप छान वाटते. पोलिस अधिकारी संदीप पाटील, तेजस्वी सातपुते, अमितेश कुमार, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खूप काही शिकायला मिळते, अशी भावना त्या व्यक्त करतात. त्यांनी उघड केलेले निवडक गुन्हे पुढीलप्रमाणे…

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

Loading…

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

The post वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka