(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)दिनकर फकीरराव कदम हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात काम करत आहेत. लहानपणापासून वर्दीचे आकर्षण असल्यामुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि अधिकारी झाले.
पोलिस दलात काम करत असताना अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. एखाद्या दिवसाचे काम त्याच दिवशी पूर्ण करणारा, नकारात्मामधून सकारात्मक विचार करणारा आणि वेळेचे बंधन पाळणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…
दिनकर कदम यांचे नाशिक जिल्ह्यातील देवळाली हे गाव. शेतकरी कुटुंबातील जन्म. आजही चार पिढ्या एकत्र नांदत आहेत. एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे असल्याचे सांगतात. कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळे धार्मिकतेवर भर. लहानपणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. आई-वडिलांनी रोजंदारीची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकला. वडिलांनी पुढे म्हशींचा व्यवसाय सुरू केला आणि आर्थिक परिस्थिती बदलत गेली. म्हशींचा व्यवसाय, भला मोठा गोठा आजही आहे. दिनकर कदम यांनी लहानपणापासूनच शेती आणि म्हशी सांभाळून शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण घेत असल्यापासूनच वर्दीचे आकर्षण होते. बारावीमध्ये असताना कॉन्स्टेबल भरतीसाठी प्रयत्न केले. पण, पुढे पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून परीक्षा दिली आणि वयाच्या २८व्या वर्षी पोलिस अधिकारी झाले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी अनेकांना मदत करण्याचे काम केले आहे. नक्षलग्रस्त भागात काम केल्यामुळे त्यांना खडतर सुरक्षा पदक, अंतर्गत सुरक्षा पदकाबरोबरच १५० रिवॉर्ड्स मिळाले आहेत.
दिनकर कदम हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात काम करत असून, त्यांच्या पाठीशी दीर्घ असा अनुभव आहे. विविध तपास करत असतानाच त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळवून देता येईल, याकडे कटाक्षाने पाहिले आहे. खाकी वर्दीच्या आतमध्ये एक माणूस दडलेला असतो. त्याप्रमाणे अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना वैयक्तिक माणूस म्हणून त्यांनी दुसऱ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. नकारात्मक गोष्ट सकारात्मक कशी करता येईल आणि स्वतःबरोबरच दुसऱ्यालाही कसा आनंद मिळवून देता येईल, याचे गणित त्यांनी आजपर्यंत सांभाळले आहे. यामुळे ताणतणावापासून नेहमीच दूर राहिले आहेत. पोलिस दलातील विविध अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. काही निवडक अनुभव पुढीलप्रमाणे…
हृदयस्पर्शी अनुभव…
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील १९९९ मधील घटना. एका विधवा महिला रोजंदारीची कामे करून कुटुंब चालवत होती. महिलेच्या नऊ वर्षाच्या मुलाने विषारी फळ खाल्ले. विषबाधा झाल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान चार-पाच दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. दिनकर कदम यांच्याकडे तपास आला आणि ते रुग्णालयात पोहोचले. मुलाचा मृत्यू झाल्यामुळे महिलेला अश्रू अनावर झाले होते. दिनकर कदम यांच्याकडे मुलाच्या आईने एक विनंती केली. कृपया, मुलाचे शवविच्छेदन करू नका. पण, का करू नये? हे जाणून घेतल्यानंतर दिनकर कदम यांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
मृत मुलाची आई सांगत होती, गडचांदूरपासून माझे गाव दूर अंतरावर आहे. जवळ तर काहीच पैसे नाहीत. मुलाचे शवविच्छेदन केले तर चिरफाड होईल. पण, जर शवविच्छेदन केले नाही तर त्याला कपड्यामध्ये गुंडाळून जिवंत आहे असे भासवून कडेवर बसवून बसमध्ये घेऊन जाता येईल. कृपा करून चिरफाड करू नका म्हणून महिला विनवणी करत होती. महिलेची विनवणी ऐकल्यानंतर श्री. कदम यांनाही वाईट वाटले. पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी महिलेची समजूत घालताना समजावून सांगितले. यानंतर महिला शवविच्छेदनासाठी तयार झाली. पण, खाकीमधील माणूस म्हणून ते महिलेच्या मदतीसाठी देवदूत म्हणून पुढे आले. स्वतःसह सहकाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली आणि जमा झालेली रक्कम महिलेकडे सुपूर्द केली. महिला पुढे आपल्या मृत मुलाचा मृतदेह वाहनामध्ये घेऊन गावाकडे निघाली. डोळ्यातील अश्रू थांबत नसतानाही महिलेने मानलेले आभार हे खूप काही देऊन गेले. या वेळी उपस्थितांना सुद्धा हृदयस्पर्शी अनुभव अनुभवायला मिळाला. शिवाय, वर्दीच्या आतमध्ये एक माणूस असतो, हे अनेकांनी अनुभवले.
पुनर्जन्म…
दिनकर कदम हे पुणे शहरातील हडपसर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. २००१ मधील घटना. एका कुख्यात आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वाहनामधून सहकाऱ्यांसह ते ससून रुग्णालयात आले होते. सुरक्षेसाठी सहकाऱ्याकडे रायफल होती. आरोपीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला वाहनामध्ये बसवले. पण, सहकाऱ्याच्या हातून चुकून रायफलमधील गोळी सुटली आणि ती दिनकर कदम यांच्या डोक्याला घासून गेली.
अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933
Loading…
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
Loading…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…
The post वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

