Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)विजय लोंढे हे गेल्या ३९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी असून, त्यांनी मोठमोठे गुन्हे उघड केले आहेत.

भारतातील सर्वांत मोठा दरोडा उघड केला असून, मोस्ट वॉन्टेड आरोपीला जेरबंद केले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या विषयी थोडक्यात…

विजय लोंढे यांचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गाव. लोंढे गल्ली येथे वास्तव्य. विजय लोंढे यांचे वडील पोपटराव हे १९५६ मध्ये ठाणे येथे पोलिस दलात दाखल झाले होते. नामांकित पैलवान म्हणून वडिलांची ओळख होती. कुटुंबाला पोलिस दलाचा वारसा असल्यामुळे विजय लोंढे वयाच्या १८व्या वर्षी पोलिस दलात भरती झाले. पुढे त्यांचे दोन भाऊसुद्धा पोलिस दलात भरती झाले. यामुळे संपूर्ण कुटुंबच पोलिस दलात राहून नागरिकांची सेवा करत आहेत. विजय लोंढे यांच्याकडे पोलिस दलातील जुना आणि नवीन अनुभवांचा मोठा खजिना आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा असून, तब्बल २० हजार जणांचे नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहेत. पोलिस दलातील ३९ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गुन्हे उघड केले आहेत.

विजय लोंढे यांनी जुन्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. साधारण ३५ वर्षांपूर्वी कशा पद्धतीच्या चोऱ्या होत होत्या. पोलिस त्यांना कसे पकडत होते. नागरिकांमध्ये पोलिसांची कशी दहशत होती. शिवाय, हल्लीच्या चोरांची पद्धत आणि बदलले पोलिस दल याविषयी त्यांनी जुन्या आणि नव्याचा मेळ साधला आहे. पूर्वीच्या काळी सुद्धा त्यांनी अनेक गुन्हे उघड केले असून मोबाईलच्या जमान्यामध्येही अनुभवाचा उपयोग करत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.

३५ वर्षांपूर्वी…
– सायकल, कारटेप, उघड्यावरील चोऱ्या, पाण्याचे मीटर यांची प्रामुख्याने चोरी होत असे
– पोलिसांना रस्त्यावर पाहिले की नागरिक पळून जायचे
– चित्रपटगृहाच्या परिसरात गेले की तिकीट ब्लॅक करणारे धूम ठोकायचे
– एखाद्या चौकात शिट्टी मारली तरी शुकशुकाट पसरायचा
– नेपाळी गुरखा हे पोलिसांना रात्रगस्तीकरिता मदत करायचे
– रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडले की पोलिस चौकशीसाठी ताब्यात घ्यायचे. त्यामुळे पोलिसांची प्रभावी रात्र गस्त असायची. शिट्टीचा आवाज लांबपर्यंत जायचा.
– पोलिस सायकलवरून तसेच पायी गस्त घालायचे. यामुळे आरोग्य तंदुरुस्त राहत होते.
– पोलिसांची मोटार एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर मोठा गुन्हा घडला म्हणून चर्चा सुरू होत असे.
– एखाद्या व्यक्तीला संशयावरून पकडल्यानंतर सामान्यपणे त्याला कोणीही जामिनाला पोलिस स्टेशनला येत नसत. कोर्टामधूनच त्याची मुक्तता होत असे.
– साधा गोंधळ झाला तरी पोलिस ताब्यात घ्यायचे
– रेल्वे, एसटी बंद, पेट्रोलपंप बंद, डॉक्टरांचा संप असे कधी नसायचे.
– पूर्वी संप नव्हे तर एखाद्या गोष्टीचा निषेध नोंदवला जायचा
– रेडिओला खूप महत्त्व होते. आकाशवाणीवरील बातम्या ऐकल्या जायच्या.
– एखाद्या कुटुंबाला तार आली तर मोठी घटना घडली म्हणून समजले जायचे.
– परिसरात पोलिस आले तर नागरिक बंद दरवाजाच्या फटीमधून, खिडकीमधून पाहायचे. शक्यतो, मुंबई पोलिस कायद्यानुसार पोलिस कारवाई करायचे.
– बिनतारी संदेशला महत्त्व होते. कारण, त्या वेळी मोबाईलचा जमाना नव्हता.
– राजकीय नेत्यांचे दौरे सर्वप्रथम पोलिसांना समजायचे. हॉटलाइन वरून दौरे माहिती येत असायची.

टांगेवाल्यांचे पासिंग…
सध्या मोटारींचे जसे पासिंग होते. अगदी तसेच पासिंग १९८०च्या काळात होत होते. टांग्यावाल्यांचे पासिंग म्हणजे काय तर? टांग्याची अवस्था चांगली आहे का, घोडा तंदुरुस्त आहे का, टांग्यामध्ये बसण्याची व्यवस्था चांगली आहे का, हे सर्व पाहून टांगेवाल्यांना बिल्ला जात असे. सध्या मोटारींचे जसे पीयूसी काढले जाते, अन्यथा दंड आकारला जातो, अगदी तसाच घोड्याची लिद रस्त्यावर पडल्यानंतर टांगेवाल्याला दंड आकारला जात असे. १९८७-८८ पर्यंत टांगे रस्त्यांवर होते. त्यानंतर रिक्षा, टॅक्सी आल्याने बंद झाले.

एक रुपयांची मनिऑर्डर अन् आरोपी…
विजय लोंढे यांनी पूर्वीच्या काळी फिरस्ते आरोपीला पकडण्याची शक्कल सांगितली. एक सराईत आरोपी होता. आरोपी काही सापडत नव्हता. घरी जाण्यापूर्वीच तो फरार होत असे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी आरोपीच्या नावाने एक रुपयाची मनिऑर्डर केली होती. पोस्टमनला सांगून ठेवले होते की, आरोपी मनिऑर्डर घेण्यास आला की सांगा. एक रुपया ही रक्कम त्या काळी मोठी होती. एक रुपयाची मनिऑर्डर केल्यानंतर आरोपी पैसे घ्यायला पोस्टमनजवळ आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

Loading…

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

The post पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka