Dailyhunt
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)सचिन प्रभाकर वाकडे हे गेल्या १० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील लष्करात अधिकारी असल्यामुळे लहानपणापासूनच देशसेवा आणि वर्दीची आवड निर्माण झाली होती.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे वळले आणि एक-दोन गुणांमुळे हुलकावणी मिळू लागली. जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले आणि वयाच्या ३२व्या वर्षी तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि यश खेचून आणले. अपयशाची मालिका खंडित करत असताना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले. पण, हार पत्करली नाही. त्यांच्या विषयी थोडक्यात…

सचिन वाकडे यांचे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील फैजपूर हे गाव. पाच भावंडे. उच्च शिक्षित कुटुंब. सीमेवर जाऊन वडिलांनी मातृभूमीची सेवा केली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली. परंतु, अपयशाला सामोरे जावे लागले. लष्करातील अधिकारी होता न आल्याचे दुःख करत बसण्यापेक्षा पोलिस दलात अधिकारी होऊन देश सेवा करण्याचे ठरवले. प्रचंड जिद्द आणि अनेक संकटांना सामोरे जात प्रयत्न सुरूच ठेवले. एक-दोन गुणांवरून हुलकावणी मिळत होती. स्पर्धा परीक्षेची तिसऱ्यांदा जोरदार तयारी केली आणि यश खेचून आणले. पोलिस दलात राहून देशसेवा करण्याचे स्वप्न साकार झाले. आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. अपयश, अपयश, अपयश आणि यश असे झाल्यामुळे जीवनात खूप काही शिकायला मिळाले. पण, पोलिस अधिकारी झाल्यानंतर धडाकेबाज कारवाया करत असतानाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम ते करत आहेत. सातत्याने अपयश येत असताना खचून न जाता मोठ्या जिद्दीने संकटांना सामोरे गेले आणि यश म्हणजे नेमके असते तरी काय, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

लष्कराची ओढ…
वडिलांमुळे लष्कराची ओढ होती. शालेय शिक्षण घेत असतानाच लष्करात जाण्याचे निश्चित केले होते. दहावीची परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत लगेचच आर्मी कॅम्प जॉईन केला होता. लष्करातील माहितीसोबतच हत्यारांची माहिती मिळाली. लष्करातील जवान आणि देश प्रेमामुळे लष्करात जाऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहू लागले. FY B.SC. साठी प्रवेश घेतल्यानंतर एनसीसी जॉईन केले. श्री. घुले सर एकदम कडक शिस्तीचे असल्यामुळे शिस्त लागली. लहानपणापासूनच नेमबाजीची सवय होती. यामुळे नेमबाजीत पारितोषिक मिळाले.

अपयशाची पहिली पायरी…
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय नौसैनिक कँप असते. सन २००१ मध्ये महाराष्ट्रामधून २८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यामध्ये सचिन वाकडे यांचा समावेश होता. कॉलेजमधून बेस्ट कॅडेट हा पुरस्कार मिळाला होता. लष्करामध्ये भरती होण्याच्या दृष्टीने एनसीसीची तयारी सुरू होती. पण, महाविद्यालयीन अभ्यासाकडे दुर्लक्ष होत राहिले. एसवायचा निकाल हाती आल्यानंतर पहिला धक्का बसला. कारण, शेरा हा नापास होता. अपयशाची ही पहिलीच पायरी होती. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे शिक्षण घेताना शिकवले गेले होते. पण, अनुभवला पहिल्यांदा सामोरे जावे लागले होते. पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. एनसीसीमध्ये सुद्धा पुढे सी सर्टिफिकेट आणि बी ग्रेड मिळाली. शिवाय, महाविद्यालयात पहिल्या क्रमांकावर राहिले.

लष्करातील भरतीसाठी प्रयत्न…
लष्करात भरती होण्यासाठी २००३ पासून प्रयत्न सुरू केले. अभ्यास करण्यासाठी लायब्ररी लावली. दोन वर्षे अभ्यास केला. अलाहाबाद येथे २००४ मध्ये पाच दिवसांची परीक्षा होती. पहिल्या दिवशी परीक्षा पास झाले तरच थांबवले जाते अन्यथा परत पाठविले जाते. सचिन वाकडे यांना पहिल्या दिवशी थांबविल्यानंतर मोठा आनंद झाला. पुढील चार दिवस मुलाखतीसाठी सामोरे गेले. पण, अखेरच्या क्षणी अपयशाला सामोरे जावे लागले.

पुणे आणि मार्केटिंगची नोकरी…
महाविद्यालयातील अनेक मित्र कोठे ना कोठे नोकरी करू लागले होते. २००५ मध्ये पुणे शहरात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. पण, नोकरी मिळत नव्हती. काही तरी गरजेचे होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. अखेर, १७व्या दिवशी एका मार्केटिंगच्या कंपनीत नोकरी मिळाली. आनंद झाला. पुढे असिस्टंट मॅनेजर पदापर्यंत मजल मारली. पण, दुर्दैवाने कंपनीच बंद पडली. पाच वर्षे काम केल्याचा अनुभव आला होता.

बॅक टू पॅव्हेलियन…
पुणे शहरातील कंपनी बंद पडल्यानंतर पुन्हा नाशिकला जाण्याचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये आल्यानंतर तीन महिने पुन्हा एका ठिकाणी मार्केटिंगचे काम केले. पण, पगार होता फक्त पाच हजार. कामावर लक्ष लागत नव्हते. दिवस पुढे पुढे सरकत होते. एका बाजूला नैराश्य येत होते. एक दिवस वेळ हातात असल्यामुळे डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या स्टॉलवर गेले. स्पर्धा परीक्षेचा स्टॉल होता. स्टॉलवरील एका युवतीने स्पर्धा परीक्षा आणि क्लासबद्दल माहिती दिली. त्या वेळी वर्ष होते २०१० आणि वय होते २९. युवतीने दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये येण्यास सांगितले होते. एकदा स्पर्धा परीक्षा द्यायला काय हरकत आहे? असा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये गेले. क्लासमध्ये समजावून सांगण्यात आले. मनात विचार आला. स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. घरी जाऊन कुटुंबीयांकडे स्वतःसाठी एक वर्षाचा वेळ मागितला आणि तो मिळालासुद्धा.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि अपयश…
नाशिकमधील मार्केटिंगची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि क्लासमध्येच संपूर्ण दिवस जाऊ लागला. अभ्यासाची चांगली तयारी सुरू होती. लष्कर नाही तर पोलिस अधिकारी होण्याचे ठरवले होते. २०१० मध्ये प्रथम परीक्षा दिली. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले पण मुख्य परीक्षेत चार गुणांनी नापास झाले. दुसरीकडे क्लासमधील अनेक मित्र उत्तीर्ण झाले होते.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

Loading…

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

The post पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka