Dailyhunt
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)अश्फाक तांबोळी हे गेल्या ३५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. तांबोळी यांचे संपूर्ण कुटुंबच पोलिस दलात राहून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे.

गेल्या ३५ वर्षांमध्ये त्यांनी अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस चौक्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. ट्रेकिंगची आवड असल्यामुळे ताणतणाव तर नाहीच, पण आरोग्यही चांगल्या प्रकारे जपले आहे. त्यांच्याविषयी थोडक्यात…

अश्फाक तांबोळी यांचे वडील नाशिक पोलिस दलात कार्यरत होते. यामुळे पोलिस दलाविषयी त्यांना माहिती होतीच. नाशिक शहरामध्येच बालपण गेले. पोलिस पाल्य म्हणून पोलिस दलात भरतीसाठी अर्ज भरला आणि अश्फाक पोलिस दलात दाखल झाले. पुढे त्यांच्यासह दोन्ही भाऊ देखील पोलिस दलात दाखल झाले. पोलिस दलामुळे सर्व सामान्य नागरिकांची सेवा करताना मिळणारा आनंद काही वेगळाच आहे, असे अश्फाक तांबोळी सांगतात.

सहा हजारांमधून निवड…
अश्फाक तांबोळी यांचे वडील पोलिस दलात होते. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी कुटुंबाची अपेक्षा होती. पोलिस पाल्य म्हणून अर्ज केला. भरतीच्या वेळी परीक्षा देण्यासाठी तब्बल सहा हजार युवक आले होते. सहा हजार युवकांमधून फक्त ४८ जणांची निवड झाली होती. यामध्ये अश्फाक तांबोळी यांचा नंबर होता. पोलिस दलात भरती झाल्यानंतर कुटुंबीयांना मोठा आनंद झाला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगाही सरकारी नोकरी आणि तीसुद्धा पोलिस दलाची मिळाली होती.

मैदानी खेळाचा फायदा…
अश्फाक तांबोळी यांना लहानपणापासून मैदानी खेळाची आवड होती. शाळा सुटल्यानंतर वेळ हा मैदानावर जात असे. पोलिस भरतीदरम्यान मैदानी खेळाचा मोठा फायदा झाला. मैदानी खेळ आणि पळण्यामुळे शरीर चपळ झाले होते. मैदानी खेळामुळेच सहा हजार जणांमधून माझी निवड होऊ शकली, असे अश्फाक तांबोळी सांगतात. दुसरीकडे, दिवसेंदिवस मैदानी खेळ हे कमी होत चालले आहेत. सध्याच्या परिस्थितीत अनेक मुले मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर हे दुर्दैव आहे. मैदानी खेळ जेवढे खेळाल तेवढे आरोग्यासाठी चांगले आहे, असेही अश्फाक तांबोळी सांगतात.

ट्रेकिंगची आवड…
लहानपणापासून मैदानी खेळाची आवड तर होतीच. पण, पोलिस भरती झाल्यानंतरही ट्रेकिंगची आवड जोपासली आहे ती आजपर्यंत. प्रत्येक रविवारी ग्रुपने ट्रेकिंगला जातो. ट्रेकिंगमुळे आरोग्य तर तंदुरुस्त राहतेच. पण, ताणतणावही दूर निघून जातो. ट्रेकिंगमुळे ३५ वर्षांच्या नोकरीनंतरही आरोग्य उत्तम आहे. मोबाईलच्या जमान्यात प्रत्येकानेच आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

Loading…

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

The post सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka