Dailyhunt
गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com)गणेश अशोक कोंडे यांना लहानपणापासून श्वानाची आवड. वडील पोलिस दलातील श्वान पथकात कार्यरत होते. गणेशसुद्धा श्वानाच्या आवडीनेच पोलिस दलाकडे आकर्षित झाले आणि वयाच्या १८व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले.

गेल्या १६ वर्षांपासून ते पोलिस दलात असून, ११ वर्षांपासून श्वान पथकात कार्यरत आहेत. श्वानावर त्यांचे नितांत प्रेम. 'गुगल' या श्वानाला लहानपणापासून त्यांनी प्रशिक्षण दिले असून, गुगलने अनेक गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, राष्ट्रीय पातळीवर गुगल डॉग शोमध्ये चौथा आला आहे. श्वानामुळे आपल्याला ओळख मिळाली आहे, असे गणेश कोंडे सांगतात. त्यांच्याविषयी थोडक्यात…

गणेश कोंडे यांचे वडील, आजोबा पोलिस दलात कार्यरत होते. कुटुंबाचा पोलिस दलाचा वारसा तिसऱ्या पिढीने म्हणजे गणेश यांनी जपला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धामणखेड हे त्यांचे गाव. वडील नाशिक पोलिस दलात असल्यामुळे लहानपणापासून ते नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. गणेश यांना सहा बहिणी. बहीण भावंडांमध्ये ते सर्वांत लहान. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. लहानपणापासूनच त्यांनी खासगी नोकऱ्या केल्या. वडिलांची सेवानिवृत्ती जवळ आल्यानंतर घर जाईल, या भीतीने त्यांनी वयाच्या १८व्या वर्षीच पोलिस भरतीसाठी फॉर्म भरला आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिस दलात दाखल झाले. नोकरी करत असतानाही त्यांनी पुढे शिक्षण चालू ठेवले आणि पदवी प्राप्त केली.

श्वान पथक…
बोलकी माणसे गुन्हे करतात आणि मुके श्वान त्याचा छडा लावतात. पोलिसांचे श्वान पथक हे त्याचे उत्तम उदाहरण. शिस्तीचे पालन, सूचनांचे पालन, वासाचे प्रशिक्षण, माग काढणे इ. प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानुसारच त्यांचे स्पेशलायझेशन ठरते. श्वानाचा सांभाळ अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. पोलीस श्वानांना दिले जाणारे प्रशिक्षणही अन्य श्वानांपेक्षा खडतर असते. सक्ती किंवा ताकीद फक्त शब्दांतून द्यावी लागते. मारहाण तर अजिबातच चालत नाही. श्वानाची वासाची क्षमता तीव्र असते आणि ते जमिनीवर आणि हवेतून दोन्ही सुगंध घेण्यास सक्षम असतात. एखाद्या वासावरून श्वान एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला लपवून ठेवलेले असले तरी ते शोधून काढतात. खून, दरोडा, घरफोडी इत्यादी गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी श्वानांचा वापर केला जात आहे.

श्वानाचा वापर…
1) पहारा, 2) गस्त, 3) ट्रॅकिंग, 4) सुगंध ओळखणे, 5) हरवलेल्या व्यक्तींचा शोध, 6) लपलेले गुन्हेगार शोधण्यासाठी परिसर शोधणे, 7) धोकादायक गुन्हेगारांना एस्कॉर्ट करणे, 8) प्रतिबंध करणे गुन्हेगार किंवा संशयित पळून जाण्यापासून आणि 9) एखाद्या व्यक्तीचा शोध घेणे ज्याने उशिरा गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःला लपवले असेल.

शोध पथकातील श्वान कसे निवडतात…
लष्कर अथवा पोलिस दलामध्ये काय शोधायचं आहे? यानुसार या कामात वेगवेगळ्या प्रजातीच्या (ब्रीड) श्वानाचा उपयोग केला जातो. त्याप्रमाणेच त्यांना प्रशिक्षित दिले जाते. सामान्यपणे लष्करात जर्मन शेफर्ड, लेब्रोडोर, बेल्जियन शेफर्ड्स आणि ग्रेट स्विस माऊंटेन या प्रजातीच्या श्वानांचा उपयोग होतो. भारतीय प्रजातींमध्ये (ब्रीड) मुधोल हाऊंडचाही उपयोग श्वान पथकात शोधमोहिमेसाठी होतो. मुधोल हाऊंड एकमेव भारतीय प्रजाती आहे जिला सैन्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे हे भारतीय प्रजातीचे श्वान पथक सीमेवरील शत्रूच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवते आणि लवकर स्फोटकांचा शोध लावते. महाराष्ट्र पोलिस दलात एकूण ४५० श्वान आहेत.

श्वान पथकांचे प्रशिक्षण…
मेरठ, शाहजहांपूर, चंदीगड या ठिकाणी या श्वान पथकांना खास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये या श्वान पथकांसाठी वेगवेगळे कोर्स असतात. यात बेसिक डॉग ट्रेनर्स कोर्स, बेसिक आर्मी डॉग ट्रेनर्स कोर्स फॉर इंडियन एअर फोर्स अशा अभ्यासक्रमांचा समावेश असतो. त्यांना जवानांप्रमाणेच प्रशिक्षित केले जाते. लष्करातील हे श्वान पथक डॉग्स ट्रेकिंग, गार्डिंग, माईन डिटेक्शन, एक्सप्लोसिव्ह डिटेक्शन, इंफंट्री पेट्रोलिंग, अॅवेलॉन्च रेस्क्यू ऑपरेशन, सर्च, रेस्क्यू आणि नार्कोटिक डिटेक्शनचे काम करते. सरकार या पथकांवर मोठा खर्चही करते.

श्वानाची निवड कशी…
एखाद्या श्वानाची निवड करायची असेल तर सर्वप्रथम त्यांची वंशावळ तपासली जाते. जन्मल्यापासून ४५ ते ६० दिवसांच्या दिवसाच्या श्वानाची निवड केली जाते. पुढे त्याला प्रशिक्षण दिले जाते. १८ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ते पूर्ण तयार होते. साधारणतः श्वानाचे आयुष्य हे १५ वर्षे असते. पोलिस दलात १० वर्षे सेवा केल्यानंतर त्याची सन्मानाने सेवानिवृत्ती जाहिर केली जाते. एखाद्या व्यक्तीने सांभाळ करण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांना ते दिले जाते.

अधिक माहिती वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा…
https://forms.gle/p194SgfRYQuFNdxMA
WhatsApp: 92721 94933

Loading…

नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!

श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

The post गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka