Dailyhunt
नामांकित कंपनीत नोकरी पाहिजे? अशी जाहिरात पाहिली असेल तर थांबा.

नामांकित कंपनीत नोकरी पाहिजे? अशी जाहिरात पाहिली असेल तर थांबा.

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये मुलांची डायरेक्ट परमनंट भरती. पगार १६,५०० ते ६०,००० आणि भरपूर प्रलोभणे असणारी जाहिरात परराज्यात, परजिल्ह्यात केली जाते.

बेरोजगार युवकांची मानसिक, शारिरीक आणि आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार सध्या पुणे जिल्ह्यातील Ranjangaon Midc मध्ये होत आहे.

परराज्यात, परजिल्ह्यात अथवा सोशल मीडियावरून नोकरीची जाहिरात व्हायरल केली जाते. अनेक बेरोजगार युवक नोकरीच्या आशेने संपर्क साधतात. स्थानिकांनी संपर्क केल्यानंतर समोरून उत्तर दिले जात नाही. मात्र, परराज्यातील अथवा परजिल्ह्यातील बेरोजगार युवकांना शोधून त्यांना बोलावले जाते. रांजणगाव एमआयडीसीमध्ये एकदा आले की सुरू होते ती गुलामगिरी. एखाद्या खोलीमध्ये गुलामासारखे डांबले जाते. नको ती कामे करून घेतली जातात. पोटभर जेवण मिळत नाही. पैसे मागितल्यानंतर मारहाण केली जाते. शिवाय, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. अगोदरच बेरोजगार आणि त्यामध्ये दहशतीखाली जीवन जगावे लागते. अनेकजण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात. पण, संधी मिळताच अनेकजण गुपचूप सुटका करून घेतात आणि पळ काढतात. जीवंत राहिलो हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्यामुळे तक्रार न करता निघून जातात.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

The post नामांकित कंपनीत नोकरी पाहिजे? अशी जाहिरात पाहिली असेल तर थांबा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka